साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने मान्यवरांच्या प्रतिक्रिया
भारत हे हिंदु राष्ट्र असूनही येथे हिंदूंची ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ अशी अवस्था आहे. सहिष्णू असणार्या हिंदूंनी अनेक धर्मांच्या अनुयायांना या देशात उदारपणे आश्रय दिला; पण या आश्रितांनीच हिंदूंना त्यांच्या मातृभूमीतून विस्थापित करण्याची आणि त्यांच्या कत्तली करण्याची मोहीम चालू केली. येथील हिंदूंनी मात्र राम आणि कृष्ण यांच्या नावावर कधीच अन्य धर्मियांच्या कत्तली केल्या नाहीत. सर्व जग हिंदूमय करायचे; म्हणून कधी इतर धर्मियांची प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त केली नाहीत. कधीही इतर देशांवर आक्रमणे करून त्यांचा भूभाग बळकावला नाही; पण आज त्याच सहिष्णू हिंदूंना आतंकवादी ठरवण्यासाठी अनेक षड्यंत्रे रचली जात आहेत आणि दुर्दैवाने या षड्यंत्रात स्वतःला धर्मनिरपेक्ष समजणार्या, सत्तेसाठी लाचार झालेल्या स्वार्थी, आत्मघातकी आणि अपघाताने हिंदू म्हणून जन्मलेल्या हिंदूंचाच सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. या देशाच्या एका माजी पंतप्रधानाने तर या देशातील संसाधनांवर पहिला हक्क मुसलमानांचा असल्याचे जाहीर करून हिंदूंना दुय्यम नागरिकत्व बहाल करण्यासही कमी केले नाही.
अशा भीषण परिस्थितीमध्ये ‘सर तनसे जुदा’ (शीर धडापासून वेगळे करणे) या धमकीची पर्वा न करता अनेक साधू-संत, विचारवंत ठामपणे हिंदूंची बाजू घेऊन धर्मद्रोही आणि देशद्रोही यांच्या विरुद्ध जिवावर उदार होऊन लढत आहेत. काहीजण हिंदु संघटनांच्या चळवळीमध्ये प्रत्यक्ष भाग घेऊन लढत आहेत, काही जण भाषणे देऊन लढत आहेत, तर काही जण धन देऊन लढत आहेत. काही जण लेखणीच्या माध्यमातून हिंदूंना जागृत करण्यात प्रयत्न करत आहेत. दुर्दैवाने हिंदुत्वनिष्ठ लेखकांसाठीसुद्धा या देशातील परिस्थिती अनुकूल नाही. अगोदरच या देशात हिंदुत्वनिष्ठ लेखक अतिशय कमी प्रमाणात आहेत. त्यातही भारतातील बहुतांश ‘प्रिंट मीडिया’ हा हिंदूविरोधी आहे. त्यामुळे हिंदूंची बाजू घेऊन लिहिणार्या लेखकांना फारसे कुणी स्थान देत नाही. एकट्या महाराष्ट्राचा विचार केला, तरी आज या राज्यात प्रसिद्ध होणार्या सहस्रो दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक यांच्यापैकी हिंदूंची बाजू घेणार्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येईल, एवढी अल्प आहे; पण अभिमानाने सांगावेसे वाटते की, गेल्या २५ वर्षांपासून ‘सनातन प्रभात’ हेच असे एक साप्ताहिक आणि दैनिक आहे, जे हिंदूंची बाजू अतिशय समर्थपणे आणि निर्भीडपणे घेत आहे.
अनुकूल परिस्थितीत अनेक जण सोबत येत असतात; पण खरे सोबती तेच असतात, जे प्रतिकूल परिस्थितीतही साथ देतात. ‘सनातन प्रभात’ यापैकी एक असे वृत्तपत्र आहे की, जे हिंदूंना त्यांच्या प्रतिकूल परिस्थितीमध्येसुद्धा समर्थपणे साथ देत आहे. हिंदु राष्ट्र स्थापन करणे, हेच ‘सनातन प्रभात’चे उद्दिष्ट आहे आणि आपले हे ध्येय ‘सनातन प्रभात’ने कधीच लपवूनही ठेवले नाही. अनेक हिंदुत्वनिष्ठ लेखकांना आपले विचार मनमोकळेपणाने मांडण्याची संधी ‘सनातन प्रभात’ने दिली आहे. त्यांचे हे ऋण हिंदुत्वनिष्ठ लेखक कधीही विसरणार नाहीत. गीतेतील वचनाप्रमाणे धर्माचे रक्षण आणि त्याची स्थापना यांसाठी, तसेच दुष्प्रवृत्तींच्या नाशासाठीच जणू ‘सनातन प्रभात’चा जन्म झाला आहे, असे म्हटले, तरी ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही. ‘सनातन प्रभात’चा आरंभ होऊन २५ वर्षे होत आहेत. ‘सनातन प्रभात’च्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांना माझ्या अनेक शुभेच्छा !
‘सनातन प्रभात’चा वेलु गगनावरी जावो. या देशातील प्रत्येक हिंदूच्या घरी ‘सनातन प्रभात’ वाचला जावो आणि लवकरच या देशातील हिंदूंचे ‘हिंदु राष्ट्रा’चे स्वप्न साकार होवो, अशी मी या निमित्ताने ईश्वरचरणी नम्र प्रार्थना करतो.