पतीने अतीमद्यपान करणे आणि कुटुंबाची काळजी न घेणे, हे मानसिक क्रौर्य ! – छत्तीसगड उच्च न्यायालय

प्रतिकात्मक छायाचित्र

रांची (झारखंड) – पतीने अतीमद्यपान करणे आणि कुटुंबाची काळजी न घेणे, हे मानसिक क्रौर्य आहे, असे छत्तीसगड उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गौतम भादुरी आणि न्यायमूर्ती संजय अग्रवाल यांनी नमूद केले.

पायल शर्मा विरुद्ध उमेश शर्मा या खटल्यातील क्रूरतेच्या कारणावरून विवाह संपुष्टात आणण्याची अनुमती मागणाची पत्नीची याचिका स्वीकारली. पती दारूच्या नशेत पत्नीला शिवीगाळ करत होता. परिस्थिती इतकी बिघडली की, दारू खरेदी करण्यासाठी त्यांनी घरातील वस्तूही विकल्या, असे न्यायालयाला सांगण्यात आले.