राहुल गांधी यांचे मूळ आडनाव ‘खान’ आहे ! – अभिनेते शरद पोंक्षे

अभिनेते शरद पोंक्षे यांची काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका !

मालेगाव (नाशिक) – राहुल गांधी यांचे मूळ आडनाव खान आहे. ते फिरोज खान यांची पिलावळ आहेत. हाच त्यांचा इतिहास आहे, असे विधान अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले. येथे भारतीय विचार मंचाच्या वतीने प्रबोधन आणि जनजागृती यांसाठी वीर सावरकर यांच्यावर आधारित व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यात श्री. पोंक्षे यांनी वरील टीका केली.

सौजन्य झी २४ तास 

ते पुढे म्हणाले, एक तर तू (राहुल) गांधी नाही अन् सावरकरपण नाही. ते महात्मा गांधींचे वंशज नाहीत. या मूर्खांना स्वतःच्या आजीचा इतिहास ठाऊक नाही, तर त्यांना सावरकरांचा इतिहास कसा ठाऊक असेल ?