आम आदमी पक्षाचे नेते जावेद अहमद याच्या विरोधात गुन्हा नोंद !

  • नूंह (हरियाणा) येथील हिंसाचारात हिंदुत्वनिष्ठ नेत्याच्या हत्येचे प्रकरण

  • जावेद अहमदच्या बचावासाठी आम आदमी पक्ष प्रयत्नशील

नूंह (हरियाणा) – येथे झालेल्या दंगलीत बजरंग दलाचे नेते प्रदीप कुमार यांची हत्या करण्यात आली होती. प्रदीप कुमार यांच्या हत्येच्या प्रकरणी आम आदमी पक्षाचा नेता जावेद अहमद याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या दंगलीत त्याचे नाव समोर येताच आम आदमी पक्ष त्याच्या साहाय्यासाठी पुढे आला आहे. देहलीत वर्ष २०२० मध्ये झालेल्या हिंदुविरोधी दंगलीतील मुख्य सूत्रधार आणि आपचा नेता ताहिर हुसेन याच्या बचावासाठी आम आदमी पक्षाने जे केले होते, तेच नूंह दंगलीतील सूत्रधार जावेद अहमदसाठी करत आहे, असे एका वृत्तात म्हटले आहे.

त्यांना मारून टाका, पुढचे मी बघतो ! – जावेद अहमद

जावेद अहमद

बजरंग दलाचे नेते प्रदीप कुमार यांच्या हत्येच्या प्रकरणी पोलिसांना एक चित्रफीत  मिळाली आहे. यामध्ये या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार पवन यांनी सांगितले, ‘प्रदीप कुमार आणि मी नूंहमधील नल्हार मंदिरातून बाहेर पडल्यावर आम्ही गाडीने जात असतांना मुसलमानांची गाडी आडवी आली. त्यामुळे आम्हाला आमची गाडी थांबवावी लागली.  त्या गाडीत उपस्थित असलेला जावेद अहमद त्याच्या साथीदारांना उद्देशून म्हणाला, ‘त्याला (प्रदीप कुमार यांना) मारा, पुढे काय करायचे, ते मी बघतो.’

१. देहली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी ट्ीवट करत म्हटले आहे की, दंगल भडकावणे आणि निरपराध्यांना मारणे, हे आम आदमी पक्षाचे वेगळे राजकारण आहे का ? आम आदमी पक्षाच्या दंगलखोर आणि हिंदुविरोधी चेहर्‍याविषयी बोलतांना त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली.

२. आम आदमी पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनुराग धांडा यांनी जावेद अहमदवर नोंदवलेल्या गुन्ह्याविषयी स्पष्टीकरण देतांना भाजपवर जोरदार टीका केली. भाजप आता षड्यंत्र रचून समाजात फूट पाडण्याचे काम करत आहे, असे धांडा म्हणाले.

संपादकीय भूमिका 

  • देहली येथील दंगलीत आपच्या धर्मांध नेत्याचा हात होता आणि नूंह येथील दंगलीतीही या पक्षाच्या धर्मांध नेत्याचा हात असल्याचे समोर येत आहे. यावरून ‘हा पक्ष म्हणजे दंगली घडवून हिंदूंना मारणारा पक्ष आहे’, असे समजायचे का ?
  • या पक्षाचे खरे स्वरूप आल्यावर निधर्मीवादी आणि पुरोगामी गप्प आहेत, हे लक्षात घ्या !