
मुंबई, १९ जुलै (वार्ता.) – लंपी रोगावरील लस सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्रशासनासमवेत सामंजस्य करार केला आहे. ही लस सिद्ध करण्यासाठी पुणे येथे एका प्रयोगशाळेची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेत लसीची निर्मिती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य लंपी रोगावरील लसीचा पुरवठा देशाला करेल, अशी माहिती पशूसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत दिली.
१९ जुलै या दिवशी काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी लातूर येथे लंपी रोगामुळे जनावरांचा मृत्यू झाल्याचा प्रश्न सभागृहात उपस्थित करून शेतकर्यांना आर्थिक साहाय्य करण्याचे आवाहन केले. यावर विखे पाटील यांनी विधीमंडळाचे अधिवेशन संपण्यापूर्वी उर्वरित शेतकर्यांना आर्थिक साहाय्य करण्याचे आश्वासन दिले. लंपी रोगामुळे राज्यात एकूण ३९ सहस्र ६५४ पशूधनाचा मृत्यू झाला असून ३७ सहस्र ५२८ शेतकर्यांना आर्थिक साहाय्य करण्यात आले आहे. लंपी रोगावरील दुसर्या टप्प्यातील लसीकरण चालू करण्यात आले असल्याचे या वेळी विखे पाटील यांनी सांगितले.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !