उत्तरप्रदेशमध्ये जिहादी आतंकवाद्याने रचला होता ट्रकद्वारे आक्रमण करून लोकांना चिरडण्याचा कट !

सद्दाम शेख

गोंडा (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाने २ जुलै या दिवशी लक्ष्मणपुरी येथून सद्दाम शेख याला अटक केली होती. सद्दाम याने जर्मनी आणि फ्रान्स येथे ट्रकद्वारे लोकांवर आक्रमण करण्याचा कट रचला होता. त्यासाठी तो प्रतिदिन ट्रकच्या माध्यमांतून करण्यात आलेल्या आतंकवादी आक्रमणाचे व्हिडिओ पहात होता. गर्दीच्या ठिकाणी लोकांवर ट्रक चढवून त्यांना चिरडून मारण्याचा त्याचा डाव होता. जुलै २०१६ मध्ये फ्रान्समध्ये एका सण साजरा केला जात असतांना एका आतंकवाद्याने मालवाहक ट्रक लोकांवर चढवला होता. यात ८६ जणांचा मृत्यू झाला होता. याच प्रकारे सद्दाम याचा भारतात आक्रमण करण्याचा प्रयत्न होता.

सद्दाम याने चौकशीत सांगितले की, त्याच्यावर आतंकवादी ओसामा बिन लादेन, जाकिर मूसा, रियाज नायकू, नावेद जट्टर, समीर टायगर आदी आतंकवाद्यांचा प्रभाव आहे. सद्दामच्या भ्रमणभाष संचामध्ये या सर्वांचे व्हिडिओ आणि छायाचित्रे सापडली. सद्दाम बेंगळुरूच्या एका आस्थापनामध्ये ट्रकचालक म्हणून काम करत होता. तो सामाजिक माध्यमे आणि अ‍ॅप यांद्वारे पाकिस्तानमधील आतंकवाद्यांच्या संपर्कात होता.

संपादकीय भूमिका

अशा आतंकवाद्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देऊन तिची कार्यवाही केली, तर इतरांवर वचक बसेल !