(म्हणे) ‘औरंगजेब माझा आदर्श : त्याने अखंड हिंदुस्थानावर राज्य केले !’

बी.आर्.एस्. पक्षाचे नेते मौलाना कादीर यांचे वादग्रस्त विधान !

बी.आर्.एस्. पक्षाचे नेते मौलाना कादीर (मध्यभागी)

छत्रपती संभाजीनगर – राज्यात गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाचे छायाचित्र ‘स्टेटस’ (इतरांना पहाता येण्यासाठी सामाजिक माध्यमांच्या स्वतःच्या खात्यावर ठेवलेले चित्र किंवा लिखाण) म्हणून ठेवल्याने वाद पेटला होता. नगर, अमळनेर आणि कोल्हापूर येथील काही भागांत हिंसक आंदोलन झाले होते. या आंदोलनांवरून भाजपवर टीका करतांना ‘भारत राष्ट्र समिती’ (बी.आर्.एस्.) पक्षाचे नेते मौलाना कादीर यांनी ‘औरंगजेब माझा आदर्श आहे, त्याने अखंड हिंदुस्थानावर राज्य केले आहे’, असे वादग्रस्त विधान केले.

मौलाना कादीर पुढे म्हणाले की, भाजपकडे दिशाभूल करण्यासाठी पुष्कळ सूत्रे आहेत. निवडणुकीपूर्वी अनेक सूत्रे भाजपवाले समोर आणतील. औरंगजेब असा बादशाह आहे, ज्याने अखंड भारतावर ५२-५३ वर्षे राज्य केले आहे. त्याचे छायाचित्र ‘स्टेटस’वर ठेवल्याने ‘औरंगजेबाची अौलाद जन्माला आली’, असे म्हणणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कुणी रोखत नाही का ? हिंदु बांधवांना कळायला हवे. अशा प्रकारे विधाने करून त्यांना काय दाखवून द्यायचे आहे. असे ‘स्टेटस ठेवणारा गुन्हेगार आहे का ? मी नक्कीच औरंगजेबाला आदर्श मानतो. जेव्हा त्याचा शेवट आला, तेव्हा खिशात दफन करण्याएवढेच पैसे होते. असा बादशाह मी जगात कुठेही पाहिला नाही.

संपादकीय भूमिका :

  • असे म्हणणे हा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा घोर अवमान आहे ! अशा मोगलप्रेमींना हिंदूंनी त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे !
  • औरंगजेबाला आदर्श मानणारे अशा पक्षाचे नेते उद्या सत्तेत आल्यावर औरंगजेबाप्रमाणे अनुकरण करू लागल्यास आश्चर्य वाटणार नाही ! असे होऊ द्यायचे नसेल, तर हिंदु राष्ट्राची स्थापना करा !