३ गुन्हे नोंद

अमरावती – गुरुवारी बकरी ईदच्या दिवशी शहरात अनेक ठिकाणी गोवंशियांची कुर्बानीच्या नावाखाली हत्या करण्यात आली. बडनेरा पोलीस हद्दीतील चमननगर, नागपुरी गेट पोलीस हद्दीतील ताजनगर आणि ताजनगर क्रमांक २ येथे गोवंशिची कुर्बानी दिल्याचे उघड झाल्याने पोलिसांनी एकूण ३ आरोपींवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम आणि विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले आहेत.
एका आरोपीने गोवंशियांचे मुंडके, मास रस्त्यावर फेकून दिले होते. दुसर्या घटनेत आरोपी अहेमद बेग उस्मान बेग याने त्याच्या घरात गोवंशियाची कत्तल केली. येथून पोलिसांनी ३० सहस्र ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ताजनगर क्र. २ येथे मोहम्मद इकबाल मोहम्मद फारूक याला अडीच वर्षीय गोर्ह्याचे तोंड, हात-पाय दोरीने बांधून कापतांना रंगेहात पकडले.
छत्रपती संभाजीनगर येथे धर्मांध मुसलमानाच्या विरोधात गुन्हा नोंद !
सिडको परिसरातील तलावांमधील प्रदूषणाची चौकशी होणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
ग्रामीण भागांत २० विद्यार्थ्यांमागे ३ शिक्षक अनुज्ञेय ! – डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री
ए.पी.एम्.सी. येथे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे जयंती उत्साहात साजरी
देहू (पुणे) ते पंढरपूर ‘सायकल वारी’ची दशकपूर्ती !
Dhubri Beef Arrest : धुबरी (आसाम) : गोमांस बाळगणार्या ५ जणांना अटक : गोमांस जप्त