नवी देहली – केंद्र सरकार देशातील भटक्या कुत्र्यांची समस्या लवकर सोडवण्यासाठी कायदा बनवणार आहे. याविषयी केंद्रीय पशूपालनमंत्री पुरषोत्तम रूपाला यांनी माहिती दिली.
केंद्र सरकार जल्द ही आवारा कुत्तों की समस्या पर एक कानून बनाएगी.#ModiGovernment #StrayDogIssuehttps://t.co/EQFJ7NERyp
— Zee News (@ZeeNews) June 28, 2023
१. रूपाला म्हणाले की, या संदर्भात एक विधेयक बनवण्यात आले आहे. याला मंत्रीमंडळाची संमती मिळाल्यानंतर ते संसदेत सादर केले जाईल. लोकांनी अनेक सूचना केल्या आहेत. सध्याच्या कायद्यात पालट करण्याची आवश्यकता आहे.
२. भटक्या कुत्र्यांच्या संदर्भातील एक याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात केरळमध्ये भटक्या कुत्र्यांच्या आक्रमणात एका विकलांग मुलीचा मृत्यू झाला होता. यानंतर केरळ राज्य बाल अधिकार संरक्षण आयोगाने हिंसक भटक्या कुत्र्यांवर कारवाई करण्याचा आदेश देण्याची मागणी यात केली आहे. यावर न्यायालयाने संवेदना व्यक्त करत १२ जुलैला यावर सुनावणी करण्याचे सांगितले आहे.