सनातनची साधिका कु. प्रणाली पाटील हिचे इयत्ता १० वीच्‍या परीक्षेत सुयश !

सनातनची साधिका कु. प्रणाली पाटील

सांगली, १९ जून (वार्ता.) – येथील सनातनचे सह्याद्रीनगर येथील साधक श्री. गजानन पाटील आणि सौ. धनश्री पाटील यांची मुलगी अन् सनातनची साधिका कु. प्रणाली पाटील हिने इयत्ता १० वीच्‍या परीक्षेत ९७.२० टक्‍के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. कु. प्रणाली ही सांगली येथील ग.रा. पुरोहित कन्‍या प्रशाला येथे शिक्षण घेत आहे. या शाळेत तिचा चौथा क्रमांक आला आहे. सनातनच्‍या विविध उपक्रमांतील प्रासंगिक सेवांमध्‍ये तिचा सहभाग असतो. या यशाविषयी तिने सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त केली आहे.