देहली विश्‍वविद्यालयात विद्यार्थ्याची चाकूद्वारे हत्या !

मैत्रिणीवरून आरोपींशी झाला होता वाद !

नवी देहली – देहली विश्‍वविद्यालयाच्या दक्षिण दिशेकडील परिसरात निखिल चौहान या विद्यार्थ्यावर चाकूद्वारे आक्रमण करून त्याची हत्या करण्यात आली. निखिल याचे काही दिवसांपूर्वी मैत्रिणीवरून आरोपींशी वाद झाला होता. त्यातूनच ही हत्या करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणाद्वारे आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक केली आहे. हारून आणि राहुल अशी त्यांची नावे आहेत.

संपादकीय भूमिका

देहलीतील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती प्रतिदिन वाईटच होत चालली आहे. याकडे सरकारने गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे !