रा.स्व. संघ मणीपूरमधील पीडितांच्या पाठीशी ! – सरकार्यवाह होसाबळे

नवी देहली – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मणीपूरमधील ५० सहस्रांहून अधिक पीडितांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये हिंसाचार आणि द्वेष यांना  स्थान नाही, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मत आहे. कोणत्याही समस्येचे निराकरण केवळ परस्पर संवादाने आणि शांततापूर्ण वातावरणात बंधुभावाच्या अभिव्यक्तीतूनच शक्य आहे, असे संघ मानतो, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांनी व्यक्त केले.

सरकार्यवाह होसाबळे पुढे म्हणाले की, मैतेई लोकांमधील असुरक्षितता आणि असाहायतेची भावना अन् कुकी समुदायाच्या खर्‍या चिंतेचे एकाच वेळी निराकरण केले जाऊ शकते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मणीपूरमधील राजकीय गट आणि सामान्य जनतेला सध्याच्या अराजक अन् हिंसक परिस्थितीचा अंत करण्यासाठी सर्वतोपरी पुढाकार घेण्याचे आवाहन करतो.