मदरशाचे अचानक निरीक्षण केल्याने त्याच्या संचालकाकडून सरकारी अधिकार्‍याला परिणाम भोगण्याची धमकी !

पोलिसांकडून गुन्हा नोंद

सिद्धार्थनगर (उत्तरप्रदेश) – येथील एका मदरशाची तपासणी करण्यास गेलेल्या सरकारी अधिकार्‍यांना धमकावण्यात आले. या प्रकरणी मरदशाच्या संचालकाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

बस्ती प्रभागाच्या अल्पसंख्यांक कल्याणाचे उपसंचालक विजय प्रताप यादव आणि अधिकारी तन्मय पांडेय हे येथील जलालुल मदरशाच्या तपासणीसाठी गेले होते. या निरीक्षणामध्ये ३ पैकी १ कर्मचारी अनुपस्थित आढळून आला. यासह ३ शिक्षकांपैकी २ शिक्षक उपस्थित नव्हते. त्यांच्या अनुपस्थितीचे कोणतेही लेखी कारण देण्यात आले नव्हते. मदरशात प्रचंड अस्वच्छता होती. त्यांनी स्वतः तेथे केर काढला. यानंतर मदरशाला १७ जूनपर्यंत या संदर्भात उत्तर देण्यासाठी नोटीस बजावण्यात आली. यावर मदरशाचा व्यवस्थापक सुलतान अहमद याने यादव यांना दूरभाष करून ‘परिणाम वाईट होतील’, अशी धमकी दिली. यानंतर यादव यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली.

संपादकीय भूमिका 

सरकारने अशा मदरशांची अनुमती रहित करून त्यांना टाळे ठोकले पाहिजे आणि संचालकाला कारागृहात डांबले पाहिजे !