‘अल्पसंख्यांकांना दोष देऊ नका !’ कारण…

या स्वतंत्र हिंदुस्थानात आज अशी वेळ आली आहे की, ‘सर्वसामान्य हिंदूचे जीवन सुरक्षित आहे’, असे म्हणता येत नाही. कामकाजासाठी बाहेर गेलेली आपल्या घरातील प्रिय व्यक्ती रात्री सुखरूप घरी परत येईल, याची निश्चिती आता देता येणार नाही. असा काळ आता लांब नाही.

श्री. दुर्गेश परुळकर

१. हिंदु बांधवांचे रक्षण करू न शकणारा हिंदूंचा षंढपणा !

राजधानी देहलीमध्ये साहिल नावाच्या एका मुसलमान तरुणाने एका कुमारवयीन मुलीची (साक्षीची) सैतानाला ही लाज वाटेल, अशा प्रकारे हत्या केली. आपल्या देशातील नागरिकांची प्रतिकारनिष्ठा पूर्णपणे नष्ट झाल्याचा अनुभव देहलीत झालेल्या हत्येच्या वेळी विशेषत्वाने आला. हा षंढपणा नवीन आहे, असे मात्र नाही.

अ. काही वर्षांपूर्वी मध्य मुंबईत भरदिवसा एका महिलेला जिवंत जाळण्यात आले. त्या महिलेच्या रक्षणार्थ कुणीही धावले नाही.

आ. सांगलीत भर दिवसा अमृता देशपांडे हिचा कोथळा बाहेर काढण्यात आला. तेव्हाही तिला वाचवण्यासाठी कुणीही पुढे सरसावले नाही.

इ. दहावीच्या परीक्षेला बसणार्‍या रिंकू पाटील नावाच्या एका विद्यार्थिनीला परीक्षा केंद्रात जिवंत जाळण्यात आले. त्या वेळी ध्वनीचित्रीकरण करण्यात अनेक हात गुंतले होते; पण त्या केंद्रातील एकही हात तिच्या रक्षणार्थ पुढे सरसावला नाही.

ई. मुंबईच्या लोकलमध्ये एका महिलेचा विनयभंग करण्यात आला. तिथे पुरुषांची संख्या पुष्कळ होती; पण तिच्या रक्षणार्थ पुढे जाण्याचे धैर्य एकाही पुरुषात नव्हते. तोच प्रकार आता देहलीत घडला आहे.

उ. ‘सगळे धर्म समान शिकवण देतात’, हा भ्रम आहे’, हे कळत असूनही आम्ही शांत आहोत. २९ मे या दिवशी देहलीत घडलेली घटना लव्ह जिहादचाच प्रकार असल्याचे उघड झाले आहे.

२. या प्रश्नांची उत्तरे कुणाकडे आहेत का ?

अ. ‘सीसीटीव्ही’त साहिल साक्षी नावाच्या अल्पवयीन मुलीला मारत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. आता या कर्दनकाळाला लगेचच शिक्षा होईल का ?

आ. या क्रूरकर्म्याची बाजू जाणून घेण्यासाठी दयाबुद्धी दाखवली जाणार आहे का ?

इ. त्याला सुधारण्याची संधी दिली जाणार आहे का ?

ई ‘अशा प्रकारच्या किती हत्या करण्याची मुभा त्याला दिली जावी’, यावर चर्चा होणार आहे का ?

उ. तो निष्पाप म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे का ?

ऊ.  तो गरीब आहे, त्याची मन:स्थिती चांगली नाही, याचा विचार करून त्याला क्षमा करण्यात येणार आहे का ?

ए. जिची हत्या झाली, त्याच मुलीला दोषी ठरवण्यात येणार आहे का ?

ऐ. ती हिंदू म्हणून जन्माला का आली ? या देशात अल्पसंख्यांकांनी त्यांच्या मनासारखे काही घडत नाही; म्हणून बहुसंख्यांकांचे मुडदे पाडण्याचा त्यांना राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने अधिकार दिला आहे ?

ओ. साहिलने अत्यंत प्रेमाचा उमाळा येऊन तिला सुखदुःखाच्या यातनातून मुक्त केले, असे हिंदूंनी समजायचे का ?

औ. कुराणानुसार काफिरांना स्वर्गात जागा नाही, तसेच या भूतलावरही जागा नाही. त्यांची जागा नरकात आहे; म्हणून अल्पसंख्य समाजाला काफीरांची हत्या करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्याचा विचार देशातील विचारवंत मंडळी आता उजळ माथ्याने करणार आहेत का ?

अं. हिंदूंच्या कितीही हत्या झाल्या, तरी हिंदूंनी मरणालाच सामोरे जावे; कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त करू नये, तशी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली, तर राज्यघटनेची पायमल्ली होते आणि लोकशाही धोक्यात येते. आता हिंदूंच्या वारंवार होणार्‍या हत्येमुळे लोकशाही शांततेच्या परमोच्च शिखरावर जाऊन पोचली आहे; म्हणून मेजवान्या दिल्या जाणार आहेत का ?

क. ज्यांनी ही क्रूर हत्या होतांना पाहिले, त्यांनी साहिलला विरोध केला नाही किंवा पकडले नाही म्हणून त्यांना भारताचे ‘आदर्श नागरिक’ म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे का ?

ख. मणीपूरमधूनही हिंदूंना जीव वाचवण्यासाठी पळून यावे लागले. काश्मीरमधील हिंदूंना परागंदा होण्याची वेळ आली. केरळमध्ये हिंदूंची होणारी हत्या, बंगालमध्ये निवडणुकीनंतर झालेले हिंदूंचे शिरकाण या घटना अल्पसंख्यांकांचे जीवन धोक्यात असल्याचे चिन्ह आहे का ?

या आणि अशा प्रश्नांची गर्दी सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाली आहे. यांपैकी एकाही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळेल, अशी आशा राहिली नाही; कारण हिंदु समाज अधिकाधिक षंढ होत चालला आहे. त्यांच्यातील प्रतिकारशक्तीच नष्ट झाली आहे आणि त्यांनी प्रतिकार केला की, लगेच ‘हिंदु आतंकवाद’, ‘भगवा आतंकवाद’ म्हणून गळा काढायला विचारवंत अन् बुद्धीजीवी मोकळे आहेत. साक्षीसाठी मात्र त्यांच्या डोळ्यात आसवे नाहीत; कारण मरणारी मुलगी हिंदु आहे आणि मारणारा मुसलमान आहे. मुसलमान त्यांच्या धर्माचे पालन आणि त्यांच्या परंपरेचे जतन करतात; म्हणून त्यांचे कौतुक करण्यासाठी लक्षावधी तोंडे पुढे येतील.

३. हिंदु समाजाचे जीवन सुरक्षित करण्यासाठी सरकारनेच उपाय काढणे आवश्यक !

‘मूर्तीभंजक हे हिंदूंच्या मंदिरात जाऊन जेव्हा तिथे चादर चढवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते त्यांची परंपरा पाळतात’, अशी भूमिका घेणारे आपल्याच देशात लक्षावधी विचारवंत आहेत. त्यांची ही परंपरा कधीपासून चालू झाली ? मूर्तीभंजक मूर्तीपूजक कधी झाले ? या प्रश्नांची उत्तरे मात्र असा विचार करणार्‍या लोकांकडे नाहीत. हे सत्य दुर्लक्षित करून हिंदूंना जीवन जगता येत नाही आणि मरणही नैसर्गिक नाही. अशा विचित्र कोंडीत सापडलेल्या हिंदु समाजाने बलहीन आणि निस्तेज होऊन जगावे, अशीच इच्छा इथल्या तथाकथित विचारवंतांची आहे का ? या आणि अशा प्रश्नांची मालिका कधीही न संपणारी आहे. यावर सरकारनेच ठोस उपाय काढून बहुसंख्यांक असलेल्या हिंदू समाजाचे जीवन सुकर आणि सुरक्षित व्हावे; म्हणून कठोर पावले उचलणे क्रमप्राप्त आहे. अन्यथा पुनःश्च पारतंत्र्याच्या अंधारात हिंदूंना सडावे लागेल. त्यातून मुसलमानांचा पक्ष घेणार्‍या हिंदु विचारवंतांची सुद्धा सुटका होणार नाही, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे.

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (३०.५.२०२३)