लव्ह जिहाद विरोधात कायदा करण्यासाठी प्रयत्न करणार ! – गोपीचंद पडळकर, आमदार 

पुणे येथे ‘लव्ह जिहाद’ प्रकरण घडल्याचा गोपीचंद पडळकरांचा पत्रकार परिषदेत दावा !

मंचर (जिल्हा पुणे) – येथील मुसलमान समाजातील एका तरुणाने अल्पवयीन तरुणीला ४ वर्षांपूर्वी पळवून नेऊन अत्याचार केल्याचा आरोप पडळकर यांनी २६ मे या दिवशी पत्रकार परिषदेत केला आहे. पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबियांना समोर आणत त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली आहे. आरोपीला पोलिसांच्या कह्यात दिले असून त्याला शिक्षा झाली पाहिजे, तसेच लव्ह जिहाद विरोधात कायदा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पडळकर यांनी सांगितले. ‘राज्यात लव्ह जिहादच्या घटना घडल्या नाहीत, मला लव्ह जिहाद माहिती नाही’, असे म्हणणारे पीडित तरुणी आणि तिचे कुटुंबीय यांना भेटून त्यांची भावना जाणून घेणार का ?’ असा प्रश्न विचारत पडळकर यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे.

पडळकर यांनी सांगितले की, आरोपी पीडित मुलीला फुस लावून पळवून उत्तरप्रदेशला घेऊन गेला. त्या घटनेला जवळपास ४ वर्षांचा कालावधी लोटला. त्याकाळात पीडित मुलीच्या घरातील मंडळींनी वेळोवेळी पोलिसांकडे दाद मागितली; पण योग्य प्रकारे अन्वेषण झाले नाही. (पोलीस आणि न्याययंत्रणा यांच्या अनास्थेमुळे हिंदूंवर अन्याय होत आहे हे दुर्दैवी आहे ! योग्य प्रकारे अन्वेषण न करणार्‍यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी ! – संपादक) या ४ वर्षांच्या काळात मुलीला बुरखा घालण्यास भाग पाडले, गोमांस खाऊ घातले, तिच्यावर अत्याचार करण्यात आले, तिला नमाज पडण्यास सांगितले. गेले ६ मास आरोपी हा मंचर इथल्या घरी पीडित मुलीला घेऊन राहू लागला. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि हा चित्रपट पीडित मुलीच्या घरच्या मंडळींनी पाहिला. तो पाहून आपल्या मुलीचे काय झाले असेल ? ही चिंता पुन्हा वाटू लागली आणि पुन्हा एकदा कुटुंबियांनी तिचा शोध चालू केला. तेव्हा आरोपी हा मुलीसह गावात आल्याची माहिती मिळाली. (सामान्य घरातील हिंदु युवतींपासून क्रीडा क्षेत्र, चित्रपटसृष्टी आदी विविध क्षेत्रांतील अनेक हिंदु युवती आणि महिला आतापर्यंत ‘लव्ह जिहाद’ला बळी पडल्या असून त्यांची फसवणूक झाली आहे, तसेच त्यांचे भयावह शोषणही होत आहे, याची अनेक उदाहरणे विविध माध्यमांतून समोर आली आहेत. ‘लव्‍ह जिहाद’च्‍या विळख्‍यात सापडलेल्‍या युवतींच्‍या आयुष्‍याची राखरांगोळी होते. त्यामुळे अन्‍य राज्‍यांत झालेल्‍या कायद्याप्रमाणे महाराष्‍ट्रातही ‘लव्‍ह जिहाद’विरोधी कायदा लवकरात लवकर होणे आवश्यक आहे ! – संपादक)