कुस्ती संघटनेच्या अध्यक्षांना अटक करून कारागृहात पाठवा !  

योगऋषी रामदेवबाबा यांची ब्रिजभूषण सिंह यांचे नाव न घेता मागणी

योगऋषी रामदेवबाबा

हरिद्वार (उत्तराखंड) – देशाच्या कुस्तीपटूंनी जंतरमंतरमध्ये बसून कुस्ती संघटनेच्या अध्यक्षांवर गैरवर्तन आणि व्यभिचार यांचा आरोप करणे ही अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे. अशा व्यक्तीला तात्काळ अटक करून कारागृहात पाठवावे, अशी मागणी योगऋषी रामदेवबाबा यांनी केले आहे. कुस्ती संघटनेचे अध्यक्ष हे ब्रिजभूषण सिंह असून ते भाजपचे खासदार आहेत; मात्र रामदेवबाबा यांनी त्यांचे नाव न घेता त्यांना अटक करण्याची मागणी केली. गेल्या काही आठवड्यांपासून कुस्तीपटू सिंह यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी धरणे आंदोलन करत आहेत. सिंह यांच्यावर कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. सिंह यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असला, तरी त्यांना अटक करण्यात आलेली नाही.

रामदेवबाबा पुढे म्हणाले की, प्रतिदिन हे अध्यक्ष वारंवार आई, बहीण, मुली यांच्याविषयी निरर्थक बोलत आहेत, हे अत्यंत निंदनीय आहे, हे अधर्म आणि पाप आहे.