
बरेली (उत्तरप्रदेश) – येथील मुसलमानबहुल करेली गावात एका हिंदु तरुणाची चारचाकी आणि धर्मांध युवकाची दुचाकी यांचा किरकोळ अपघात झाला. अपघाताचे निमित्त साधून तेथील हिंसक धर्मांध मुसलमान जमावाने हिंदु तरुणावर आक्रमण करत त्याला बेदम मारहाण केली. रक्तबंबाळ झालेल्या हिंदु तरुणाला वाचवण्यासाठी त्याचे ओळखीचे लोक आले असता त्यांच्यावरही आक्रमण करण्यात आले. जमावाने त्याच्या गाडीचीही तोडफोड केली. हिंदु तरुणाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोनिस, जावेद, साजिद, युनूस, परवेझ यांच्यासह ३० ते ४० आक्रमणकर्त्यांच्या विरोधात गुन्हे नोंदवले असून काही जणांना कह्यात घेतले आहे.
धर्मांधांच्या जमावाने आक्रमण केलेल्या या हिंदु तरुणाचे नाव हॅप्पी ताराचंद्र असे असून तो बुखारा गावचा रहिवासी आहे. ताराचंद्र याने पोलिसांना सांगितले की, तो चारचाकीमधून कारली गावातून जात असतांना समोरून येणारी दुचाकी कारला धडकली. यात कुणीही घ्यायाळ झाले नाही आणि दुचाकीची कोणतीही हानी झाली नाही. त्यानंतर दुचाकीस्वार तरुणांनी गावातील लोकांना बोलावून त्याला मारहाण करणे चालू केले. जमाव वाढतच गेला. लाथा-बुक्क्यांनी, लाठ्या-काठ्यांचा मारा चालू ठेवला. मी रक्तबंबाळ झालो. मी जमावाकडे दयेची याचना केली; परंतु रक्तपिपासू धर्मांधांनी मला ठार मारण्याचा दृढनिश्चय केला होता. ही माहिती मिळताच पोलिसांंनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी माझा जीव वाचवला आणि मला रुग्णालयात भरती केले. या प्रकरणी पोलिसांनी अन्वेषण चालू केले आहे, असे पोलीस अधीक्षक राहुल भाटी यांनी सांगितले.
संपादकीय भूमिकाही स्थिती रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! |
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !