सद्गुरु अंजलीताई माऊलींच्या दर्शनाने मन हे तृप्त झाले ।

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

‘३.३.२०२२ या दिवशी गुरुकृपेमुळे मला श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे दर्शन झाले. तेव्हा त्यांच्याविषयी जे वाटले, ते शब्दांत लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.

श्रीमती मनीषा मराठे

म्हणतात सर्व सद्गुरु अंजलीताई (टीप १)।
अहो ती तर आहे, सर्व साधकांची आई ।। १ ।।

रूपात भरला असे संपूर्ण आदरभाव ।
अहंकार, गर्व यांचा नसेची ठाव ।। २ ।।

गुर्वेच्छा म्हणून, सदैव केले जगभ्रमण ।
दिसला नाही कधी शरीर, मनावर ताण ।। ३ ।।

असे मधुर बोलणे ।
त्यामुळे सर्वांना आपलेसे करणे ।। ४ ।।

वागतांना कुठेही येत नाही कर्तेपण ।
गुरूंसी अर्पिले सर्व मीपण ।। ५ ।।

प्रीती, भाव अन् श्रद्धा रोमारोमांतच ठसली ।
म्हणूनच गुरूंच्या हृदयात वसली ।। ६ ।।

काय बोलावे, काय लिहावे, शब्द न उरती ।
म्हणूनच सहज कर इथे जुळती ।। ७ ।।

माऊलींच्या दर्शनाने मन हे तृप्त झाले ।
जणू माझे भाग्यच उजळले ।। ८ ।।

अशीच राहो सदैव प.पू. गुरुदेवांची कृपा ।
तेच करतील जीवनाचा मार्ग सोपा ।। ९ ।।

टीप १ – सद्गुरु अंजलीताई : श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ’

– श्रीमती मनीषा रत्नाकर मराठे (पू. (कै.) प्रा. रत्नाकर मराठे, अमरावती यांच्या पत्नी, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ६७ वर्षे ), अमरावती. (३.१२.२०२२)

  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक