जम्मू-काश्मीरमध्ये सैनिकांना अटक करता येणार नाही !

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – केंद्रशासनाने जम्मू-काश्मीर आणि लद्दाख येथे भारतीय सैन्य अन् सर्व निमलष्करी दल यांच्या सैनिकांना अटकेपासून संरक्षण प्रदान केले आहे. त्यानुसार आता केंद्रशासनाच्या अनुमतीविना सैनिकांना अटक करता येणार नाही. अनेक वेळा काश्मीरमधील धर्मांध मुसलमानांनी सैनिकांवर आक्रमण केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या वेळी सैनिकांनी त्याचा प्रतिकार केल्यावर सैनिकांवरच कारवाई केली जात होती.