गूगलकडून भारतातील वैयक्तिक कर्ज देणारे ३ सहस्र ५०० अ‍ॅप्स बंद !

धोरणांचे उल्लंघन केल्याचा ठपका !

कॅलिफॉर्निया – धोरणांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी गूगलने भारतातील वैयक्तिक कर्ज देणारे ३ सहस्र ५०० अ‍ॅप्स बंद केले आहेत. गूगलने हे अ‍ॅप्स ‘प्ले-स्टोअर’वरून हटवले आहेत. गूगलनेच याविषयीची माहिती दिली.

वर्ष २०२२ मध्येही गूगलने धोरणांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी ‘प्ले-स्टोअर’वर १४ लाख ३० सहस्र अ‍ॅप्स प्रसारित होण्यापासून रोखले होते. ‘आम्ही धोरणांमध्ये नियमितपणे सुधारणा करून प्रक्रियांचे पुनरावलोकन करतो, तसेच गुणवत्तेच्या दृष्टीने सतत दुुरुस्ती करण्याचा प्रयत्न करत असतो’, असे गूगलने म्हटले आहे.