अतिक अहमद याच्या कबरीवर जाऊन राष्ट्रध्वज अंथरला !

  • काँग्रेसचा नेता राजकुमार सिंह याची संतापजनक कृती !

  • काँग्रेसने केले ६ वर्षांसाठी निलंबित !

अतिक अहमदच्या कबरीवर राष्ट्रध्वज अंथरताना काँग्रेसचे स्थानिक नेते राजकुमार सिंह उपाख्य रज्जू (डावीकडे)

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – कुख्यात गुंड अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांची पोलिसांच्या कह्यात असतांना गोळ्या झाडून हत्या झाल्यानंतर या दोघांना प्रयागराजमध्ये पुरण्यात आले. त्यांच्या कबरीवर काँग्रेसचे स्थानिक नेते राजकुमार सिंह उपाख्य रज्जू याने जाऊन भारतीय राष्ट्रध्वज अंथरला. यासह ‘अतिक अहमद अमर रहे’च्या घोषणा दिल्या. या घटनेचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यावर काँग्रेसने स्पष्टीकरण देत या घटनेशी पक्षाचा कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे. रज्जू येथी महानगरपालिकेच्या प्रभागा क्रमांक ४३ मधील काँग्रेसचा उमेदवार होता. या घटनेनंतर काँग्रेसने त्याला पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबित केले आहे. व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर प्रयागराज पोलिसांनी राजकुमार सिंह याला कह्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे.

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही राष्ट्रीय भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

१. रज्जू याने कबरीवर जाऊन कुराणाची वाक्य म्हटली, तसेच अतिक अहमदला ‘भारतरत्न’ देण्याची आणि ‘हुतात्मा’ असल्याचा दर्जा देण्याची मागणी केली. अतिक आणि अश्रफ यांच्या कबरीनंतर रज्जू याने अतिकचा मुलगा असद याच्याही कबरीवर राष्ट्रध्वज अंथरला.

२. या घटनेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना रज्जू याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीच अतिक अहमद याची हत्या केल्याचा आरोप करत त्यांच्या त्यागपत्राची मागणी केली.

संपादकीय भूमिका

अशांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून त्यांना आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !