आरोपी जयेश पुजारी उपाख्य शाकीर याचे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेशी संबंध !

  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी दिल्याचे प्रकरण

  • युएपीए कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवणार !

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देणारा जयेश पुजारी

नागपूर – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात दूरभाषद्वारे धमकी देणार्‍या जयेश पुजारी उपाख्य शाकीर याचे पी.एफ्.आय., म्हणजे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, श्रीलंका येथील लिट्टे गट आणि कुख्यात आंतरराष्ट्रीय आतंकवादी दाऊद इब्राहीमपर्यंत संबंध असल्याचे पोलिसांच्या अन्वेषणात समोर आले आहे. त्यामुळे त्याच्यावर अनधिकृत कृत्ये प्रतिबंध कायद्यांतर्गत (युएपीए कायद्यांतर्गत) गुन्हा नोंदवला जाणार आहे.

बेळगाव येथील कारागृहात असतांना १४ जानेवारी आणि २१ मार्च या दिवशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयात जयेश पुजारी याने दूरभाष केला होता.

 (सौजन्य : TV9 Marathi) 

या वेळी त्याने पहिल्यांदा १०० कोटी आणि दुसर्‍यांदा १० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. ही खंडणी न दिल्यास नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी त्याने दिली होती. जयेश पुजारी याने पूर्वी धर्मांतर केले आहे.