बेंगळुरू येथे काँग्रेसचे मुसलमान आमदाराकडून ३६० पेक्षा अधिक हिंदूंची समाधी उद्ध्वस्त !

स्मशानभूमीवर अवैध बांधकाम करतांना समाधी पाडली

बेंगळुरू – जे.जे.आर् नगर येथील वॉर्ड नंबर १३६ मध्ये हिंदूंची ४ ठिकाणी स्मशानभूमी आहे. तेथील ३६० पेक्षा अधिक हिंदूंची समाधी काँग्रेसचे स्थानिक आमदार जमीर अहमद आणि काँग्रेसच्या माजी नगरसेविका सीमा अल्ताफ खान यांचे पती अल्ताफ खान यांन उद्ध्वस्त केल्याचा आरोप हिंदु संघटनांनी केला आहे.  जे.जे.आर् नगर वॉर्डातून काँग्रेसचा नगरसेवक निवडून आला आहे.

आर.टी.आय चे एस्. भास्करन् म्हणाले, ‘‘इथल्या एका स्मशानभूमीवर बेंगळुरू महानगरपालिकेची इमारत अवैधरित्या बांधण्यात आली. त्यासाठी ३६० पेक्षा अधिक थडगी उद्ध्वस्त करण्यात आली. या संदर्भात गेल्या नोव्हेंबर मासात तक्रार प्रविष्ट केली. ६ मार्चला लोकायुक्त अधिकार्‍यांना पहाणी करण्यासाठी निवेदन देण्यात आले, तसेच याविषयी चौकशी करण्यासाठी गृहसचिवांना निवेदन दिले आहे. एवढे करूनही आतापर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. (निवेदनांना केराची टोपली दाखवणारे प्रशासन काय कामाचे ? – संपादक) यात सहभागी असलेल्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (मुळात अशी मागणीच का करावी लागते ? प्रशासनाच्या हे लक्षात येत नाही का ? – संपादक)

संपादकीय भूमिका

काँग्रेसच्या धर्मांध आमदाराकडून वेगळी काय अपेक्षा करणार ? धर्मांध लँड जिहाद करण्यासाठी पद आणि अधिकार यांचा वापर करतात, हे यातून दिसून येते. अशांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !