गुरु माता-पिता; गुरु बंधू, सखा ।
तव चरणी स्वामी माझे कोटी प्रणाम ।। १ ।।
हे दयाघना, हे श्रीकृष्णा, कशी आळवू रे मी तुला ।
समजे ना या मनाला ।। २ ।।
देवा, कसे करू तुझे स्मरण ।
समजे ना या मनाला ।। ३ ।।
देवा, कशी बाहेर पडू या विचारांच्या विळख्यातून ।
तूच सांग ना रे नाथा ।। ४ ।।
कशी करू या मनाला अंतर्मुख ।
तूच सांग ना रे गुरुराया ।। ५ ।।
देवा, अखंड स्मरायचे आहे तुला ।
करायची आहे झोकून देऊन सेवा ।। ६ ।।
करून घेशील ना या पामराकडून प्रयत्न ।
घेशील ना या जिवाला तुझ्या जवळ ।। ७ ।।
व्याकुळ झाले मी ।
आता येण्या तव चरणी ।। ८ ।।
नको आता कशाचीच आस ।
ध्येय आता केवळ गुरुचरणांचा ध्यास ।। ९ ।।
मात करूनी स्वभावदोष आणि अहं यांवरी ।
व्हायचे आहे समर्पित तुझ्या चरणी ।। १० ।।
कृतज्ञताभावात राहून करून घे तूची प्रयत्न ।
हीच प्रार्थना या जिवाची तव चरणी ।। ११ ।।
अडकायचे नाही आता कशात ।
रहायचे आहे देवाच्या मनात ।। १२ ।।
– कु. मानसी अग्निहोत्री, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.