ढाका – बांगलादेशातील बंदरबन जिल्ह्यातील रोवांगछरी उपजिल्ह्यातील दुर्गम भागात दोन जातीय गटांमध्ये नुकताच हिंसाचार झाला. या हिंसाचारात ८ जण ठार, तर अनेक जण घायाळ झाले. पोलीस अधिकारी अब्दुल मन्नान यांनी सांगितले की, घटनास्थळावरून ८ मृतदेह कह्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
नहीं थम रही हिंसक झड़प की घटनाएं, दो गुटों की लड़ाई में 8 लोगों की मौत, मची अफरातफरीhttps://t.co/TOl2OtD1MD
— IBC24 News (@IBC24News) April 8, 2023
पोलिसांनी सांगितले की, हिंसाचारानंतर अनुमाने २०० लोकांनी त्यांची घरे सोडली आणि रोवांगछरी येथील सैन्याच्या छावणीत आश्रय घेतला. ‘युनायटेड पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंट’मधून फुटून बाहेर पडलेल्या ‘कुकी चीन फ्रंट’ या नव्याने स्थापन झालेल्या संघटनेचे सदस्य या हिंसाचारात सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आहे.
सुरक्षा अधिकार्यांनी सांगितले की, ‘कुकी चीन फ्रंट’ हा एक सशस्त्र गट म्हणून उदयास आला आहे, ज्यात बहुतेक बोम जातीच्या लोकांचे वर्चस्व आहे आणि त्यांनी इस्लामी आतंकवादी गटाशी युती केली आहे. ‘कुकी चीन फ्रंट’च्या आतंकवादी कारवायांमुळे अनेकांना त्यांची घरे सोडून जाणे भाग पडले आहे.