जुगार अड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक !

साहाय्यक पोलीस निरीक्षक घायाळ

माजलगाव (जिल्हा बीड) – ६ एप्रिल या दिवशी तालुक्यातील छत्रबोरगाव येथे यात्रेच्या आडून चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये ग्रामीण पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खटकळ हे घायाळ झाले आहेत. या प्रकरणी परमेश्वर रावसाहेब जाधव, परमेश्वर विठ्ठल जाधव, अक्षय परमेश्वर जाधव यांच्यासह अज्ञात १५ ते २० जणांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचे पुढील अन्वेषण साहाय्यक पोलीस निरीक्षक विजयसिंह जोनवल हे करत आहेत. (पोलीसच स्वत:चे रक्षण करण्यासाठी असमर्थ असतील, तर ते जनतेचे रक्षण काय करणार ? – संपादक)