ज्ञानवापीप्रकरणी सर्व खटल्यांचे एकत्रीकरण करण्यावर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी !

नवी देहली – वाराणसी येथील ज्ञानवापी वादाच्या संदर्भात प्रविष्ट करण्यात आलेल्या सर्व खटल्यांचे एकत्रीकरण करण्याची मागणी करणारी याचिका सूचीबद्ध करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सकारात्मकता दर्शवली आहे. यावर २१ एप्रिल या दिवशी सुनावणी होणार आहे.

या प्रकरणाचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रचूड, न्यायमूर्ती नरसिम्हा आणि न्यायमूर्ती परडीवाला यांचा समावेश असलेल्या खंडपिठासमोर हिंदु पक्षाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी केला. जैन हे प्रथम दाव्यातील वादींचे प्रतिनिधित्व करत आहेत. हे सूत्र ज्ञानवापी मशिदीच्या आवारात ‘शिवलिंग’ दिसल्याच्या दाव्याशी संबंधित आहे. जैन यांचे म्हणणे आहे की, वाराणसी न्यायालय या प्रकरणी सुनावणी करण्याची टाळाटाळ करत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये तातडीने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. त्यावर न्यायालयाने सकारात्मकता दर्शवली.