(म्हणे) ‘अमृतपालच्या साथीदारांना २४ घंट्यांत मुक्त करा !’ – शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमिटी

  • खलिस्तानवादी ‘शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमिटी’ची चेतावणी

  • मुक्त न केल्यास सरकारच्या विरोधात गावोगावी जाऊन जनजागृती करणार, तसेच न्यायालयात प्रविष्ट करणार याचिका !

उजवीकडे अमृतपाल

नवी देहली – स्वतंत्र खालिस्तानचा समर्थक आणि ‘वारिस पंजाब दे’ या संघटनेचा प्रमुख असलेल्या अमृतपालच्या साथीदारांना २४ घंट्यांत मुक्त करण्याची चेतावणी ‘शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमिटी’चे प्रमुख हरजिंदरसिंह धामी यांनी पंजाब सरकारला दिली आहे. तसे केले नाही, तर सरकारच्या विरोधात गावोगावी जाऊन जनजागृती करण्यात येईल. तसेच ‘ज्या लोकांना अटक करण्यात आली आहे, त्यांच्या कुटुंबियांनी मला संपर्क करावा, मी न्यायालयात याचिका प्रविष्ट करीन’, असेही धामी यांनी म्हटले आहे. आतापर्यंत पंजाब पोलिसांनी २०० हून अधिक खलिस्तानसमर्थकांना अटक अथवा कह्यात घेतले आहे.

या वेळी धामी म्हणाले की, अमृतपालच्या विरोधात राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी अयोग्य पद्धतीने वार्तांकन केले. शिखांना अपकीर्त करण्याचे या माध्यमातून षड्यंत्र रचण्यात आले आहे. त्यामुळे आम्ही राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांच्या विरोधातही कायदेशीर कारवाई होण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

संपादकीय भूमिका 

आता ‘शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमिटी’च्या प्रमुखांच्या मुसक्याही आवळण्याची आवश्यकता आहे !