बळजोरीने जगन्नाथ पुरी मंदिरात घुसणार्‍या रेहमान खान याला अटक

पुरी (ओडिशा) – रेहमान खान नावाचा मुसलमान येथील जगन्नाथ पुरी मंदिरात बळजोरीने घुसल्याने पोलिसांनी त्याला नुकतीच अटक केली. या मंदिरात अहिंदूंनाा प्रवेश निषिद्ध आहे. २५ वर्षीय रेहमान याने मंदिरातील नियमांचा भंग करणे आणि धार्मिक भावना दुखावणे या प्रकरणी त्याला अटक केली.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार बंगालमधील मुर्शिदाबाद येथील रेहमान हा जगन्नाथ पुरी मंदिरात घुसला, तेव्हा सुरक्षा कर्मचार्‍यांनी त्याला पकडले. या वेळी त्याने पोलिसांना शीवीगाळ केली. ‘या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे’, असे पोलिसांनी सांगितले.

संपादकीय भूमिका 

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हा धर्मांधांकडून केलेला अश्‍लाघ्य प्रयत्न आहे, हे जाणा !