अमेरिकेत एकत्रित कुटुंबपद्धत झपाट्याने होत आहे रूढ !

२३ टक्के प्रौढ त्यांचे पालक आणि आजी-आजोबांसोबत रहातात

न्यूयॉर्क – अमेरिकेत एकत्र कुटुंबपद्धत झपाट्याने वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. देशातील २३ टक्के प्रौढ आता त्यांचे पालक आणि आजी-आजोब यांचासमवेत रहातात. ‘ए.आर्.पी.’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार वर्ष २०१५ ते २०२० या कालावधीमध्ये एकत्रितरित्या रहाणार्‍या कुटुंबांची संख्या २८ टक्क्यांवरून ३० टक्क्यांवर गेली आहे. अमेरिकेत वयस्क पालक आणि प्रौढ मुले यांची काळजी घेण्यार्‍या पिढीला ‘सँडविच’ पिढी म्हणून संबोधले जाते. ‘एकाच वेळी वृद्ध पालक आणि मुले यांच्या दायित्यामुळे अशा कुटुंबांवर ताण येतो’, असे मानले जाते; पण ‘कालांतराने ही कुटुंबे पालक आणि मुले यांच्यात समतोल राखायला शिकतात’, असेही समोर आले आहे.

१. विभक्त कुटुंबापेक्षा एकत्रित कुटुंबातील मुले अधिक शिक्षित असल्याचे ‘प्यू रिसर्च’च्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. या सर्वेक्षणानुसार मुलांचा शैक्षणिक स्तर विभक्त कुटुंबापेक्षा चांगला असतो. एकत्रित कुटुंबांमध्ये रहाणारे किमान ३० टक्के तरुण पदवीधर आहेत, तर विभक्त कुटुंबांमध्ये ही संख्या २० टक्के आहे.

२. एकत्रित कुटुंबात रहणारे ४८ टक्के तरुण त्यांच्या कौटुंबिक जीवनात आनंदी आहेत, तर  विभक्त कुटुंबातील ४४ टक्के तरुण त्यांच्या कौटुंबिक जीवनात आनंदी आहेत, असेही या सर्वेक्षणात दिसून आले आहे.

संपादकीय भूमिका

भारतात एकत्र कुटुंब व्यवस्था मोडकळीस येत असतांना अमेरिकेत मात्र एकत्र कुटुंबपद्धत वाढत आहे ! भारतियांनी याचा विचार करावा !