‘कोणत्‍याही परिस्‍थितीत साधकाने मनाची स्‍थिती आनंदी रहाण्‍यासाठी प्रयत्नरत रहायला हवे’, हे श्री गुरु शिकवत असल्‍याचे जाणवणे

सर्व साधकांचा आधार असलेले सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘परिस्‍थिती प्रतिकूल असो किंवा अनुकूल; पण साधकाने मनाची स्‍थिती आनंदी रहाण्‍यासाठी प्रयत्नरत असायला हवे’, याची शिकवण श्री गुरु सातत्‍याने देत असतात. साधकांमध्‍ये ‘प्रत्‍येक वेळी श्री गुरु काय शिकवत आहेत’, हे लक्षात येणे आणि परिस्‍थिती आनंदाने स्‍वीकारल्‍यानेच साधना होते’, यांची जाणीव अल्‍प असल्‍याने आपले मन बर्‍याचदा दुःखी होते. या स्‍वतःच्‍या स्‍थितीचे चिंतन करतांना मला सुचलेल्‍या ओळी !

सौ. स्वाती शिंदे

आनंदाचे वरदान द्याल का हो आम्‍हाला ।

कंटाळून गेलो नेहमीच्‍या या दुःखाला ॥ १ ॥

अल्‍प पडतो देवा पहावया, प्रतिकूल परिस्‍थितीत तुला ।

जाणीव जेव्‍हा होते, तेव्‍हा पारावर न राहे कृतज्ञतेला ॥ २ ॥

प्रीती वर्षावात तुझ्‍या आनंद होई मनाला ।

समर्पित करून घेई वेगे या अज्ञानी जिवाला ॥ ३ ॥

‘गुरुदेवा, या जिवावर सर्वस्‍वी तुमचा अधिकार असतांनाही माझे मन मात्र तसा विचार करायला न्‍यून पडून स्‍वतःचे स्‍वतंत्र अस्‍तित्‍व जोपासते. माझे मन कधी कधी ऐकण्‍याची भूमिका घेते, तर कधी ते बंडखोरीही करते.

देवा, स्‍वतंत्र अस्‍तित्‍व जपण्‍याचा हा मिथ्‍या अहं नष्‍ट करून या जिवावर असलेल्‍या आपल्‍याच स्‍वामित्‍वाची आणि आपल्‍याच मालकी हक्‍काची मला जाणीव होऊन तुझ्‍या चरणी अखंड दास्‍यभावात रहाता येऊ दे’, हीच माझी आपल्‍याचरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे !’

– सौ. स्‍वाती संदीप शिंदे (आध्‍यात्मिक पातळी ६६ टक्‍के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.२.२०२२)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक