अमृतपाल सिंह याचा काका आणि वाहनचालक यांनी स्वीकारली शरणागती !

जालंधर (पंजाब) – खलिस्तानवादी अमृतपाल सिंह याचा काका हरजीत सिंह आणि वाहनचालक या दोघांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. त्यांच्यावरही विविध गुन्हे नोंद होते.

पोलिसांनी अमृतपाल याची मर्सिडीज गाडी जप्त केली आहे. आतापर्यंत अमृतपालच्या ११२ सहकार्यांना अटक करण्यात आली आहे. अमृतपाल अद्यापही पसार असून पोलीस त्याच्या अटकेसाठी धाडी टाकत आहेत.