राष्ट्र ही सांस्कृतिक कल्पना असून भारत हे हिंदु राष्ट्रच ! – रा.स्व. संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस दत्तात्रेय होसबाळे

समलखा (हरियाणा) – हिंदु राष्ट्राविषयी आम्ही १०० वर्षांपासून भूमिका मांडत आहोत. राष्ट्र ही सांस्कृतिक कल्पना असून भारत हे हिंदु राष्ट्रच आहे. त्यामुळे त्याला राज्यघटनेद्वारे स्वतंत्र हिंदु राष्ट्र म्हणून मान्यता देण्याची आवश्यकता नाही, अशी भूमिका  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस दत्तात्रेय होसबाळे यांनी येथे मांडली.

ते येथे संघाच्या प्रतिनिधी सभेच्या समारोपानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

पत्रकार परिषद पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा –