शनिवारी श्री मारुतीच्या दर्शनासाठी जाणे
साक्षात् मारुतिराया आपल्या समोर विराट रूपात उभा आहे. ‘मारुतिराया, तुझ्यासारखी दास्यभक्ती आमच्यात निर्माण होऊ दे’, असे आपण त्याला आळवत आहोत. आपण हनुमंताच्या चरणी नतमस्तक झालो आहोत. त्याच क्षणी आपल्या अंतरी शरणागतभाव निर्माण होत आहे. ‘आपल्या साधनेतील सर्व अडथळे आणि त्रास मारुतिरायाने नष्ट केले आहेत’, त्याबद्दल मारुतिरायाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करूया.’ – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था.
संग्राहक : श्री. महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४२ वर्षे), पुणे (५.१.२०२३)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |