|
मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – होळीच्या पार्श्वभूमीवर शाहजहापूर येथील ६७ मशिदींना कापडांनी झाकण्यात येत आहे. संभल येथे ८ मशिदी झाकण्यात आल्या आहेत. मुरादाबाद येथे होळीच्या पूर्वी पोलिसांच्या शांतता बैठकीत मौलाना सदाकत हुसैन याने दंगलीची धमकी दिली. या संदर्भातील व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर मुरादाबाद पोलिसांनी ट्वीट करून मौलाना हुसेनच्या विरोधात गुन्हा नोंदवल्याची माहिती दिली, तर मौलानाने क्षमा मागितली आहे. ‘सणावर विधान करून कुणाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता’, असे मौलानाने म्हटले आहे. होळीच्या वेळी मशिदींवर रंग उडाल्यास निर्माण होणार्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मशिदींना झाकण्यात येत आहेत, तर दुसरीकडे पोलीस कायदा आणि सुव्यवस्था कायम रहाण्यासाठी शांतता बैठका घेत आहेत.
शाहजहाँपुर में 67, संभल में 8… होली से पहले UP में ढकी जा रहीं मस्जिद-मजार, मुरादाबाद में पीस मीटिंग के दौरान मौलाना ने दी दंगे की धमकी#UttarPradesh https://t.co/IxBHtYLkKp
— ऑपइंडिया (@OpIndia_in) March 3, 2023
मौलाना सदाकत हुसेन याने म्हटले होते की, कुणालाही होळी खेळण्यासाठी बाध्य करू नये. असे केल्यास पुन्हा गोंधळ निर्माण होईल. यापूर्वी २ वेळा गोंधळ झाला आहे. आता झाला, तर मी चेतावणी देतो की, दंगल होईल. त्यामुळे प्रशासनाने सतर्क रहावे.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या सणांच्या संदर्भात पोलिसांच्या बैठकीत अशी धमकी देण्याचे धाडस होते आणि भाजपचे सरकार असतांना पोलीस त्याला अटक करत नाहीत, हे हिंदूंना अपेक्षित नाही ! |