सप्टेंबर २०२२ मध्ये राष्ट्रीय प्रथमोपचार शिबिर झाले. त्या वेळी फोंडा (गोवा) येथील प्रा. महावीर श्रीश्रीमाळ त्या शिबिराचे नियोजन पहात होते. फाल्गुन शुक्ल एकादशी (२.३.२०२३) या दिवशी महावीरदादांचा ४६ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त राष्ट्रीय प्रथमोपचार शिबिरात सहभागी झालेल्या साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्येे पुढे दिली आहेत.
प्रा. महावीर श्रीश्रीमाळ यांना ४६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. सौ. विदुला देशपांडे, पुणे
१ अ. प्रेमभाव : ‘प्रथमोपचार शिबिराला जातांना ‘आमची आगगाडी ८ घंटे विलंबाने येणार आहे’, हे समजल्यावर महावीरदादांनी ‘आम्हाला अडचण येऊ नये’, यासाठी अनेक पर्याय सुचवले. तेव्हा मला त्यांच्यातील प्रेमभाव आणि संवेदनशीलता जाणवली.
१ आ. ‘साधकांमधील नेतृत्वगुण वाढावा’, यासाठी त्यांना साहाय्य करणे : दादा प्रथमोपचार शिबिराचे नेतृत्व करत होते. तेव्हा ते ‘सहसाधकांमधील नेतृत्वगुण वाढावा’, यासाठी त्यांना साहाय्य करायचे. ते साधकांना ‘समोरच्या व्यक्तीचे निरीक्षण करणे, साधकांची निवड करणे’, हेसुद्धा शिकवत होते. त्यामुळे ‘विचारप्रक्रिया कशी असायला हवी ?’, हे आमच्या लक्षात आले.’
२. आधुनिक वैद्या (सौ.) साधना जरळी, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी.
२ अ. परिस्थिती स्वीकारणे : ‘दादा अनुकूल वा प्रतिकूल परिस्थितीला सकारात्मकतेने सामोरे जातात. तेव्हा त्यांचा कुणाविषयी पूर्वग्रह नसतो. कशीही परिस्थिती असली, तरी ती स्वीकारतात आणि आपल्या समवेत असलेल्या साधकांनाही तसे शिकवतात.
२ आ. अभ्यासू वृत्ती : दादांचा पुष्कळ अभ्यास आहे. ऐन वेळी कोणताही विषय ते सहजपणे मांडू शकतात आणि तशी त्यांच्या मनाची सिद्धताही असते. त्यांच्यामध्ये वैचारिक प्रगल्भता आहे.
२ इ. ते सतत समष्टीचा विचार करतात आणि समष्टीशी एकरूप होऊन जातात.’
३. सौ. ममता देसाई, मुंबई
३ अ. कृतीतून शिकवणे : ‘दादांनी सत्संगात स्वतःच्या चुका सर्वप्रथम सांगितल्या आणि ‘माझ्या कोणत्या चुका तुमच्या लक्षात आल्या ?’, असे त्यांनी आम्हाला विचारले. ‘ते उत्तरदायी साधकांनी सांगितलेले प्रयत्न कसे करतात ?’, हे आम्ही त्यांच्या कृतीतून शिकलो. यातून दादांमधील ‘ऐकण्याची वृत्ती, तसेच स्वतःला पालटण्याची तळमळ’, हे गुण आम्हाला शिकायला मिळाले.
३ आ. जाणवलेला पालट : सप्टेंबर २०२२ मध्ये राष्ट्रीय प्रथमोपचार शिबिराच्या नियोजनाची सेवा करतांना दादांमध्ये प्रेमभाव आणि सहजता वाढली आहे. ‘आता आम्ही दादांना कोणतेही सूत्र सहजपणे विचारू शकतो आणि त्यांच्याशी मोकळेपणाने बोलू शकतो’, असे वाटते.’
४. सौ. नीलांगी देसाई, गोवा
‘दादांमध्ये जिज्ञासा हा गुण आहे. त्यांना ज्या विषयाची माहिती नाही, तो विषय ते संबंधित उत्तरदायी साधकाकडून जाणून घेतात.’
५. आधुनिक वैद्या (श्रीमती) मृणालिनी भोसले, सांगली
५ अ. सहजता : ‘दादांशी ओळख झाल्यावर सर्वांत प्रथम त्यांनी मला माझ्यातील बहिर्मुखतेची जाणीव करून दिली. त्यांनी माझ्या बोलण्यातील आणि कृतीतील अनेक स्वभावदोषांची मला जाणीव करून दिली. तेव्हा त्यांच्यामध्ये सहजता असल्यामुळे मला त्यांचा राग आला नाही आणि त्यांनी सांगितलेली सूत्रे मला स्वीकारता आली.
५ आ. त्यांचे मन निर्मळ आहे. ते नेहमी अंतर्मुख असतात.’
६. डॉ. (सौ.) अश्विनी देशपांडे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), पुणे
६ अ. सेवेची तळमळ : ‘दादा अविरत सेवा करत असतात. ‘त्यांना कधी कंटाळा आला, झोप आली किंवा थकवा आला’, असे जाणवले नाही. त्यांना साधनेविषयी, प्रथमोपचार सेवेविषयी किंवा व्यवहारातील कोणतीही शंका विचारली, तरी ते त्याचे अचूक उत्तर देऊन त्यावर योग्य दृष्टीकोन देतात.’
७. सौ. मीनाक्षी पाटील (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), जळगाव
७ अ. साधकाला प्रकृतीनुसार हाताळणे : ‘शिबिरानंतर दादा साधकांना त्यांच्या प्रकृतीनुसार, म्हणजे कुणाला स्पष्ट शब्दांत, कुणाला प्रेमाने, तर कुणाला उदाहरण देऊन त्यांच्या चुका सांगतात. त्यामुळे साधकांमध्ये अंतर्मुखता निर्माण होऊन त्यांचा उत्साह वाढतो.
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १८.२.२०२३)