‘अनाम प्रेम’ संस्‍थेच्‍या तीन साधकांनी रुद्रवीणा वाजवल्‍यावर गोवा येथील महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाचे संत आणि साधक यांंना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

रुद्रवीणा हे एक प्राचीन भारतीय वाद्य आहे. सद्यःस्‍थितीमध्‍ये हे वाद्य लोप पावत चालले आहे. हे वाद्य वाजवणारे कलाकारही अल्‍प झाले आहेत. मुंबई येथील ‘अनाम प्रेम’ संस्‍थेचे संस्‍थापक प.पू. दादाजी (श्री. सुभाष देसाई), मुंबई हे या वाद्याच्‍या उत्‍थानासाठी कार्य करत आहेत. त्‍यांनी त्‍यांच्‍या संस्‍थेतील रुद्रवीणा शिकणारे कु. तृप्‍त रेवाळे (वय १० वर्षे), कु. श्‍वेतकी मयेकर (वय १६ वर्षे), श्री. आदित्‍य नेरकर या तीन साधकांना महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संगीत संशोधन कार्यात सहभागी होण्‍यासाठी पाठवले.

महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या गोवा येथील संशोधन केंद्रामध्‍ये संगीत संशोधनांतर्गत घेण्‍यात आलेल्‍या प्रयोगांमध्‍ये या तीन कलाकारांनी रुद्रवीणेवर विविध राग वाजवले. या तिघांनी रुद्रवीणेवर राग ‘यमन’ वाजवला. या वेळी उपस्‍थित संत आणि साधक यांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर

१. कु. तृप्‍त रेवाळे (वय १० वर्षे) याने रुद्रवीणेवर यमन राग वाजवणे 

कु. तृप्‍त रेवाळे

१ अ. सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना जाणवलेली सूत्रे

१. ‘कु. तृप्‍त रेवाळे राग ‘यमन’ वाजवत असतांना वातावरणातील त्रासदायक शक्‍ती न्‍यून होऊन वातावरणात चैतन्‍य प्रक्षेपित होत होते.

२. तृप्‍तच्‍या रुद्रवीणा वादनातून देवी, गणपति आणि शिव यांची तत्त्वे प्रक्षेपित होत होती. हळूहळू भावाची स्‍पंदने वाढून ‘मला शांत वाटले. ‘वातावरण चैतन्‍यमय झाले आहे’, असे मला जाणवले.’

सौ. अनघा जोशी

१ आ. श्री. निषाद देशमुख (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के, सूक्ष्म-ज्ञानप्राप्‍तकर्ता साधक), महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा यांना जाणवलेले सूत्र

१. ‘कु. तृप्‍त रेवाळे याने रुद्रवीणा वादनास आरंभ केल्‍यावर वातावरणातील चैतन्‍याचे प्रमाण वाढले.

 १ आ १. श्री. निषाद देशमुख यांना आलेली अनुभूती

अ. दृत (जलद) गतीमध्‍ये वादन होत असतांना मला आनंद आणि शांती यांची अनुभूती आली.

आ. मला भगवान शिव आणि श्री दुर्गादेवी यांचे दर्शन झाले.’

२. कु. श्‍वेतकी मयेकर (वय १६ वर्षे ) याने रुद्रवीणेवर राग ‘यमन’चे वादन करणे

कु. श्‍वेतकी मयेकर

२ अ. सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना जाणवलेले सूत्र

१. ‘कु. श्‍वेतकी रुद्रवीणेवर वादन करतांना वातावरणामध्‍ये चैतन्‍य पसरले. ‘वातावरणात भाव आणि आनंद यांचे प्रमाण अधिक झालेे’, असे मला जाणवले.’

२ आ. होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी (भरतनाट्यम् विशारद), महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा यांना आलेली अनुभूती 

१. ‘मला कु. श्‍वेतकीच्‍या वादनात शक्‍ती जाणवून माझे ध्‍यान लागले.’

३. श्री. आदित्‍य नेरकर यांनी रुद्रवीणेवर यमन राग वाजवणे

श्री. आदित्‍य नेरकर

३ अ. सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना जाणवलेले सूत्र

१. ‘श्री. आदित्‍य नेरकर यांच्‍या वादनाच्‍या वेळी वातावरणात भावाची स्‍पंदने अधिक प्रमाणात जाणवली.

३ अ १. सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना आलेली अनुभूती

अ. श्री. आदित्‍य यांचे वादन जसे पुढे जात होते, तशी भाव आणि शांती यांची स्‍पंदने वाढून माझे मन निर्विचार झाले.’

३ आ. श्री. निषाद देशमुख (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के, सूक्ष्म-ज्ञानप्राप्‍तकर्ता साधक), महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा यांना आलेल्‍या अनुभूती

१. ‘श्री. आदित्‍य नेरकर यांनी रुद्रवीणेवर वादन केल्‍यावर वातावरणात पिवळ्‍या रंगाचा प्रकाश पसरत आहे’, असे मला दिसले.

२. त्‍यांचे वादन चालू असतांना मला त्‍यांच्‍या गुरूंचे अस्‍तित्‍व जाणवत होते.’

३. कृतज्ञता

‘प.पू. दादाजी (श्री. सुभाष देसाई) यांनी रुद्रवीणा वादनावरील संशोधनासाठी आम्‍हाला ‘अनाम प्रेम’चे रुद्रवीणा वादक साधक उपलब्‍ध करून दिले. त्‍यामुळे आम्‍ही रुद्रवीणेच्‍या नादाचा अभ्‍यास करू शकलो’, यासाठी आम्‍ही महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या वतीने त्‍यांच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.’

‘रुद्रवीणा’ या वाद्याचे वैशिष्‍ट्य

‘रुद्रवीणा’ हे अतिशय प्राचीन वाद्य असून ते शिवाशी संबधित आहे. इतर वाद्यांचा श्रोत्‍यांचे मनोरंजन करण्‍यासाठी उपयोग केला जातो; परंतु ‘रुद्रवीणा’ हे वाद्य मनोरंजनासाठी नसून ते आध्‍यात्मिक (स्‍पिरिच्‍युअल) वाद्य आहे. नकारात्‍मकतेचा नाश करून शांतीकडे घेऊन जाण्‍याची क्षमता असलेले हे एक वैशिष्‍ट्यपूर्ण वाद्य आहे.’

– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के, संगीत विशारद, संगीत समन्‍वयक) आणि सौ. अनघा जोशी (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के, बी.ए. संगीत), महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा. (२१.२.२०२३)

कु. तृप्‍त रेवाळे याचे जाणवलेले वैशिष्‍ट्य !

कु. तृप्‍त रेवाळे

‘कु. तृप्‍त हा केवळ १० वर्षांचा असून तो वयाच्‍या ८ व्‍या वर्षापासून रुद्रवीणा हे कठीण वाद्य वाजवायला शिकत आहे. तो दीड वर्षामध्‍ये रुद्रवीणेवर संगीतातील ४ राग वाजवायला शिकला. साधारणपणे एक राग व्‍यवस्‍थित शिकून तो वाजवता येण्‍यासाठी न्‍यूनतम एक वर्ष लागते. महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय करत असलेल्‍या संशोधनाच्‍या अंतर्गत घेण्‍यात आलेल्‍या प्रयोगाच्‍या वेळी तृप्‍तने ४५ मिनिटे एका रागाची प्रस्‍तुती दिली. हे त्‍याचे एक आगळे वैशिष्‍ट्य आहे. त्‍याची एकूण सगळी वैशिष्‍ट्ये पाहून ‘हा दैवी बालक आहे’, असे आम्‍हाला जाणवले.

– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के, संगीत विशारद, संगीत समन्‍वयक) आणि सौ. अनघा जोशी (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के, बी.ए. संगीत), महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा. (२१.२.२०२३)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या/सद् गुरुंच्या  वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक