‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी कार्य करणार्यांसाठी एक संदेश दिला होता. त्या संदेशामधून साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी कार्य करणार्यांना दिलेल्या संदेशातून ‘निरपेक्षतेने वागल्याने सदैव आनंदी राहू शकतो’, हे लक्षात येणे
‘१४.८.२०२२ या दिवसाच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी लिहिलेला ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे ‘हिंदु राष्ट्र दर्शन’ हा लेख छापून आला आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पहिल्या ‘हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या शेवटच्या दिवशी, म्हणजे १४.६.२०१२ या दिवशी लिहिले होते, ‘जेव्हा हे हिंदु राष्ट्र येईल, तेव्हा सनातनचे साधक मागील बाकड्यांवर (बॅकबेंचर) बसलेले आणि हिंदु राष्ट्राचे विजय ढोलक वाजवणारे दुसरे कुणी तरी असतील ! आपल्याला केवळ समाधान असेल की, आपण काळानुसार कार्य केले.’ हा संदेश वाचून माझी पुष्कळ भावजागृती झाली. ‘अशी निरपेक्ष वृत्ती बाळगल्यामुळे आपण सदैव आनंदी राहू शकतो’, हे मला शिकता आले.
२. अखिल मानवजातीसाठी सतत निरपेक्षतेने कार्य करणारे आपले गुरु परात्पर गुरु डॉ. आठवले किती महान आहेत ! असे गुरु आपल्या जीवनात आले. त्यांच्या या शिकवणीमुळे अनेक साधक खर्या आनंदाची प्राप्ती करून मनुष्यजन्माचे सार्थक करून घेत आहेत.
३. जीवनाचे कल्याण करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले लाभले असल्याने त्यांचा लाभ करून घेण्याची तळमळ फार महत्त्वाची असणे आणि ‘निरपेक्ष भक्तांसाठी देवाला हिंदु राष्ट्र आणावे लागणार आहे’, हे सत्य असणे
परात्पर गुरु डॉक्टरांचा संदेश वाचून लक्षात आले, ‘गुरु आपल्याला निरपेक्षतेने वागायला शिकवून आपल्या सर्वांचे कल्याण करणारच आहेत.’ ‘हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी किंवा आपत्काळाची सिद्धता, यासाठी साधना चालू करणे याला महत्त्व नसून आपल्या जीवनाचे कल्याण करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले आपल्याला लाभले आहेत. त्यांचा आपण लाभ करून घ्यायला हवा’, ही तळमळ फार महत्त्वाची आहे’, असे मला वाटले. निरपेक्ष भक्तांसाठी देवाला हिंदु राष्ट्र आणावे लागणार आहे, हेही सत्य आहे.
४. प्रार्थना
‘हे गुरुमाऊली, तुम्ही या संदेशाच्या माध्यमातून आमच्या अंतरात निरपेक्षतेचे जे बीज रोवले आहे, त्याचा लवकर वृक्ष बनू दे आणि हे जीवन तुमच्या चरणी समर्पित होऊ दे’, अशी तुमच्या कोमल चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’
– सौ. विद्या शानभाग, फोंडा, गोवा. (२३.७.२०२२)