जोशीमठातील आपद्ग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी शंकराचार्यांकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका

न्यायालयाकडून तात्काळ सुनावणी करण्यास नकार !

नवी देहली – उत्तरखंडच्या जोशीमठातील भूस्खलनाच्या संदर्भात ज्योतिष पीठाचे शंकराचार्य जगद्गुरु स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. यावर तातडीने सुनावणी करण्यास न्यायालयाने नकार दिला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी, ‘१० जानेवारी या दिवशी या याचिका सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आल्यानंतर त्यावर सुनावणीचा विचार केला जाईल’, असे सांगितले.


या याचिकेमध्ये जोशीमठामध्ये आपद्ग्रस्त झालेल्यांचे पुनर्वसन करण्यासह त्यांना आर्थिक साहाय्य करण्याचा आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच या घटनेला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची विनंती करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

सरकारी यंत्रणा आपद्ग्रस्तांचे पुनर्वसन करण्यास अपयशी ठरल्यामुळेच हिंदूंच्या धर्मगुरूंवर अशी याचिका प्रविष्ट करण्याची वेळ येते !