भारत जोडो यात्रा रहित करा !

केंद्र सरकारची कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राहुल गांधी यांना विनंती

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया व काँग्रेसचे नेते राहुल गांधी

नवी देहली – चीनमधील कोरोनाच्या वाढत्या उद्रेकाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी राहुल गांधी यांना, ‘तुम्ही चालू केलेल्या भारत जोडो यात्रेमध्ये कोरोनाविषयीचे नियम पाळले जावेत आणि नियम पाळणे शक्य नसल्यास भारत जोडो यात्रा देशाच्या हितासाठी थांबविण्यात यावी’, असे पत्राद्वारे सांगितले आहे. राजस्थानमधील खासदार पी.पी. चौधरी, निहाल चंद आणि देवजी पटेल यांनी आरोग्यमंत्री मांडविया यांना पत्र लिहून भारत जोडो यात्रेतून पसरणार्‍या कोरोनाविषयी चिंता व्यक्त केली होती.

काँग्रेसचा यात्रा रहित करण्यास विरोध

आरोग्यमंत्र्यांच्या विनंतीवर काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले की, भारत जोडो यात्रेने मोदी सरकार घाबरले आहे. लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजप विविध प्रश्‍न उपस्थित करत आहे. ‘गुजरात निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान मोदी सर्व नियम पाळून मुखपट्टी घालून घरोघरी गेले होते का ?’, असा प्रश्‍न त्यांनी विचारला आहे.