|

संभाजीनगर – गुरु आणि चंद्र ग्रहाचा गजकेसरी योग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुंडलीत असल्याने वर्ष २०२३ पर्यंत त्यांना प्रचंड विरोधाचा सामना करावा लागेल; मात्र त्यावर मात करण्यात ते यशस्वी होतील अन् पुढची लोकसभा मोदी जिंकतील. त्यामुळे वर्ष २०२४ मध्ये पुन्हा एकदा ते पंतप्रधान बनतील. महाराष्ट्रात शिंदे-ठाकरे गट पुन्हा एकत्र येतील, असे भाकीत ज्योतिषी श्री. अनंत पांडव यांनी केले आहे. योगिराज ज्योतिष वास्तू अनुसंधानच्या वतीने तिसर्या २ दिवसांच्या राष्ट्रीय वास्तू महासंमेलनाची सांगता झाली. याच्या पहिल्या सत्रात ते बोलत होते. दुसर्या दिवशी ‘झिरो से हिरो’, ‘मंगळ’, ‘हस्तरेषा आणि पितृदोष’ या विषयांवर ज्योतिषशास्त्रातील अभ्यासकांनी विस्तृत मार्गदर्शन केले.
श्री. अनंत पांडव पुढे म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुंडलीत असलेला योग सांगतो की, ते पुढच्या लोकसभेत ४१८ जागा जिंकतील. पुन्हा एकदा पंतप्रधान होतील. जानेवारीनंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ग्रहांची दिशा पालटणार आहे. शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी थंडावत जाईल. यामुळे अडीच वर्षांनी दोन्ही गट विधानसभा निवडणुकीत एकत्र लढतील; मात्र भाजपचे बळही वाढलेले असेल.’’
पीडित महिला ग्राहकाला ५.१८ लाख रुपये व्याजासह परत करा !
‘कारगिल विजयदिना’निमित्त डोंबिवली येथे ‘ऑपरेशन कारगिल’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत’ या मोहिमांतील अनुभवकथनाचा कार्यक्रम !
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !
गंगा नदीत बिर्याणी खाणे, हा गुन्हा नाही !
संभल (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांमधील २ समुदायांमधील वादातून ठार मारण्याची धमकी
BK Hariprasad Karnataka Congress : (म्हणे) ‘सध्याचे केंद्र सरकार पाकिस्तानचे अनुसरण करत आहे !’