हिंदू आता जागृत झाले नाहीत, तर येणारी वेळ हिंदूंसाठी भयंकर असेल ! – भार्गव श्री. बी.पी. सचिनवाला

मेधे गाव (वसई) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेत संघटितपणे धर्मकार्य करण्याचा हिंदूंचा निर्धार !

मार्गदर्शन करतांना भार्गव श्री. बी.पी. सचिनवाला आणि त्यांच्या बाजूला श्री. बळवंत पाठक

वसई, २९ नोव्हेंबर (वार्ता.) – ख्रिस्ती मिशनरी सेवेच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करत आहेत. वर्ष १८५७ च्या स्वातंत्र्यपूर्व उठावाच्या वेळी वसई तालुक्यातील अनेक आदिवासी बंधूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला गेला; मात्र अनेक हिंदूंनी ते होऊ दिले नाही. सध्या तर वसई तालुक्यातील हिंदूंचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर होत आहे. असे का ? हिंदु धर्माला आध्यात्मिक वारसा लाभला आहे. त्यामुळे हिंदूंनी भ्रमित न होता धर्मांतर आणि गोहत्या आदी धर्मावरील आघातांविरोधात प्रतिकार करायला हवा. हिंदू आता जागृत झाले नाहीत, तर येणारी वेळ हिंदूंसाठी भयंकर असेल, असे प्रतिपादन पालघर जिल्ह्यातील मेधे (वसई) येथील परशुराम तपोवन आश्रमाचे संचालक भार्गव श्री. बी.पी. सचिनवाला यांनी केले. ते त्यांच्या आश्रमात २८ नोव्हेंबर या दिवशी आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत उपस्थित हिंदूंना मार्गदर्शन करतांना बोलत होते.

हिंदु जनजागृती समितीचे मुंबई आणि पालघर जिल्हा समन्वयक श्री. बळवंत पाठक यांनीही या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सभेचे सूत्रसंचालन समितीचे श्री. हेमंत पुजारे यांनी केले. सभेला वसई तालुक्यातील गावकर्‍यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. परशुराम तपोवन आश्रमातील साधकांनी पुढाकार घेऊन सभेतील सेवांमध्ये सहभाग घेतला. सभेनंतर उपस्थित धर्मप्रेमींनी संघटितपणे धर्मकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.