स्पर्धेतील सामन्यांसाठी नमाज न चुकण्याचा मुसलमानांना सल्ला !

फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेमुळे केरळमधील मुसलमान संघटनांना चिंता

प्रतिकात्मक छायाचित्र

थिरूवनंतपूरम् (केरळ) – कतारमध्ये चालू असलेल्या फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेमुळे केरळमधील मुसलमान संघटना चिंताग्रस्त झाल्या आहेत. ‘ऑल केरळ इय्यातुल खुत्बा समिती’ या इस्लामी संघटनेने मुसलमानांना ‘फुटबॉलचे सामने रात्री उशिरा असल्याने तुम्ही नमाज चुकवू नका’, असा सल्ला दिला आहे. केरळमधील रस्त्यांवर, तसेच गावांमध्ये फुटबॉल खेळाडूंचे मोठे फलक (कटआऊट्स) लावण्यात आले आहेत. यावर खुत्बा समितीने म्हटले आहे, ‘ही उधळपट्टी असून ज्यांना विशेष उत्पन्न नाही, तेही या उधळपट्टीत सहभागी होत असून हे आश्‍चर्यकारक आहे.’ शुक्रवार, २५ नोव्हेंबरला मशिदींमधील प्रवचनात याविषयी सांगण्यात आल्यावर वाद निर्माण झाला आहे.

सामना पहायचा कि नाही ?, हा नागरिकांचा अधिकार ! – केरळचे शिक्षणमंत्री

केरळचे शिक्षणमंत्री व्ही. शिवनकुट्टी म्हणाले की, लोकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यात हस्तक्षेप करण्याचा कुणालाही अधिकार नाही. सामना पहायचा कि नाही ?, संगीत ऐकायचे कि नाही ? पुस्तक वाचायचे कि नाही ?, हे ठरवण्याचा अधिकार जनतेला आहे. त्यावर बंदी घालण्याचा अधिकार कुणालाही नाही. जनजागृती करणे हा खुत्बा समितीचा अधिकार असला, तरी तो मान्य करणे किंवा न करणे, हा जनतेचाही अधिकार आहे.

संपादकीय भूमिका

  • मुसलमानांच्या धार्मिक संघटना धर्माविषयी किती जागृत आहेत, हे यावरून लक्षात येते ! हिंदूंच्या एकतरी संघटना हिंदूंना कधी धर्माचरणाविषयी सल्ला देतात का आणि दिला, तरी हिंदू तो कधी स्वीकारतील का ?