१० पैकी ३ आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा !
पुसद (जिल्हा यवतमाळ) – येथे ३ एप्रिल २००९ या दिवशी, म्हणजे श्रीरामनवमीला धर्मांधांनी दंगल घडवली होते. या प्रकरणाचा निकाल साडेतेरा वर्षांनंतर लागला आहे. या प्रकरणातील १० पैकी ३ आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावास आणि २५ सहस्र रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
जगदीश जाधव हे घरी जात असतांना १० धर्मांधांनी त्यांच्यावर तलवार आणि लोखंडी गज यांच्या साहाय्याने डोके, खांदे आणि छाती येथे १३ वार केल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी त्यांचा भाऊ अधिवक्ता भारत जाधव यांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. यानंतर धर्मांधांविरुद्ध गुन्हाही नोंदवण्यात आला.
दंगलीच्या घटनेनंतर आजपर्यंत श्रीरामनवमी उत्सवाला अनुमतीच नाही !वर्ष २००९ मधील दंगलीच्या घटनेनंतर येथे अनेक वर्षे श्रीरामनवमी उत्सवाला अनुमती मिळाली नाही. (हा हिंदूंवरील अन्याय नव्हे का ? असे व्हायला पुसद भारतात आहे कि पाकिस्तानमध्ये ? – संपादक) |
संपादकीय भूमिका
|