भाईंदरच्या खाडीत देहली पोलिसांकडून शोधमोहीम !

श्रद्धाचा भ्रमणभाषसंच आणि अन्य पुरावे आफताबने खाडीत फेकल्याचा संशय

ठाणे, २५ नोव्हेंबर (वार्ता.) – श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात देहली पोलिसांनी आता भाईंदरच्या खाडीत शोधमोहीम चालू केली आहे. आफताबच्या भ्रमणभाषचे ‘लोकेशन’ खाडी परिसरात आढळल्यानंतर संशय बळावला होता. श्रद्धाचा भ्रमणभाषसंच किंवा अन्य काही पुरावे त्याने खाडीत फेकल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने माणिकपूर पोलीस आणि २ पाणबुड्या यांच्या साहाय्याने शोधकार्य चालू आहे.