हिंदु युवतीची निर्घृण हत्या करणार्‍या आफताबला तात्काळ फाशी द्या !

सांगोला येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

सांगोला येथील तहसील कार्यालयात निवेदन देतांना धर्मप्रेमी

सांगोला (जिल्हा सोलापूर), १८ नोव्हेंबर (वार्ता.) – श्रद्धा वालकर या हिंदु युवतीचे ३५ तुकडे करून निर्घृण हत्या करणार्‍या आफताबला तात्काळ फासावर लटकवावे, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गृहमंत्री महाराष्ट्र राज्य आणि जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या नावे सांगोला येथे तहसीलदारांना १७ नोव्हेंबर या दिवशी देण्यात आले. या वेळी सर्वश्री गणपत कुमार, घेवाराम, लक्ष्मण चौधरी, महेश चौधरी, डॉ. मानस कमलापूरकर, प्रवीण जानकर, विकास गावडे, पांडुरंग पाटील, ज्ञानेश्वर उबाळे, सागर मोहिते, नवनाथ कावळे, प्रमोद ढोले, ओंकार कुलकर्णी, नवनाथ चव्हाण, संतोष पाटणे आदी धर्मप्रेमी उपस्थित होते.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, ‘लव्ह जिहाद’सारख्या घटना रोखण्यासाठी ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर विरोधी कायदा करण्यात यावा.