‘हलाल जिहाद’ – एक मायावी राक्षस !

‘आपल्याला पुराण काळातील वेगवेगळ्या राक्षसासंबंधी ऐकून किंवा वाचून ठाऊक असेलच. त्या काळी ते जनतेला त्रास द्यायचे, गुलामाप्रमाणे त्यांना वागवायचे, कुणी ऐकत नसल्यास त्यांना ठार करायचे. भक्तांना पुष्कळ त्रास झाल्यावर देवतांना त्यांच्या रक्षणासाठी अवतार घ्यावा लागत असे. सध्याच्या कलियुगात लोकसंख्येनुसार दुष्प्रवृत्तींची संख्याही वाढलेली आहे.

पुराण काळात राक्षस मायावी रूप घेऊन देवता आणि राजा यांना नाकीनऊ आणायचे. ‘हलाल जिहाद’ हाही हा एक मायावी राक्षस सध्याच्या कलियुगात निर्माण झालेला आहे. बहुतेकांना त्याच्या संबंधी माहिती नसेल; कारण तो मायावी असल्याने कुणालाच दिसत नाही; परंतु त्याचा प्रभाव गेल्या ८ वर्षांपासून दिसायला लागलेला आहे. हा मायावी राक्षस धर्मांध इस्लामी राष्ट्रे आणि जिहादी संघटना यांनी मिळून निर्माण केलेला आहे. हा मायावी राक्षस अर्थव्यवस्थाच, म्हणजे मांस-मासळी व्यवसायापासून कडधान्य, औषधे, खाण्या-पिण्याच्या वस्तू, नोकरी, मॉल, उपाहारगृह, बांधकाम व्यवसाय, खाद्यपदार्थ वितरक व्यवसाय ते सौंदर्यप्रसाधने आदी व्यवसाय गिळंकृत करत आहे. या माध्यमातून भारत सरकारची सर्व अर्थव्यवस्था तो खात असतो आणि स्वतःची अशी समांतर अर्थव्यवस्था निर्माण करत आहे. सध्या तो भरपूर श्रीमंत झालेला आहे; कारण भारताच्या अर्थव्यवस्थेपेक्षाही अधिक समांतर अर्थव्यवस्थेचा तो मालक झालेला आहे.

श्री. श्रीराम खेडेकर

याविषयीची सविस्तर माहिती हिंदु जनजागृती समितीने प्रसिद्ध केलेल्या ‘हलाल जिहाद’ या ग्रंथात असून ती आवर्जून वाचा आणि इतरांना वाचायला द्या ! (चित्रावर क्लिक करा)

________________________________________________

त्यामुळेच हा मायावी राक्षस भारतातील हिंदूंना गुलाम बनवण्याच्या मार्गावर आहे. या अर्थव्यवस्थेवर केंद्र सरकारने बंदी घातल्यावरच तो राक्षस घायाळ होणार आहे; परंतु मरणार नाही. त्यासाठी आपण सर्वांनी मिळून त्याला हाकलून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपण हलाल प्रमाणित वस्तूंचा बहिष्कार केला पाहिजे. हलाल प्रमाणित न केलेल्याच वस्तू विकत घेतल्या पाहिजेत; कारण हलाल प्रमाणित वस्तू विकत घेतल्याने आपली काही रक्कम त्या राक्षसाला जिवंत ठेवण्यास कारणीभूत ठरत आहे. अशा निर्माण झालेल्या अर्थव्यवस्थेमुळे आतंकवादी कारवाया अधिक होत असून त्यांना प्रोत्साहन मिळत असते, हे काही सांगणे न लगे ! याविषयीची सविस्तर माहिती हिंदु जनजागृती समितीने प्रसिद्ध केलेल्या ‘हलाल जिहाद’ या ग्रंथात असून ती आवर्जून वाचा आणि इतरांना वाचायला द्या.’

– श्री. श्रीराम खेडेकर, बांदोडा, फोंडा, गोवा. (१३.११.२०२२)