मिरज – येथील शासकीय दूध डेअरी सध्या बंद असून या दुग्धालय परिसराची ५२ एकर जागा मोक्याच्या ठिकाणी आहे. जवळच असणारे रेल्वे स्थानक आणि कोल्हापूर विमानतळ यांमुळे ही जागा कोणत्याही अन्य कारणासाठी वापरण्यापेक्षा येथे ‘आयटी पार्क’ बनवण्यासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे, असे दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. या संदर्भात ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’चे स्वप्नील शहा म्हणाले, ‘‘शासनाच्या सध्याच्या धोरणानुसार दुग्ध व्यवसायात शासन सक्रीय होण्याऐवजी ही जागा ‘बिजनेस पार्क’ किंवा ‘आयटी पार्क’ साठी वापरण्यात यावी, असेच धोरण सध्या असणार आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या पुढाकाराने वरील प्रस्ताव अमलात आणण्यासाठी संपर्क करत आहे.’’