पी.एफ्.आय.च्या हिंसाचारामुळे केरळमध्ये ८६ लाख रुपयांची हानी !

केरळ सरकारने केरळ उच्च न्यायालयाला दिली माहिती

कोच्चि (केरळ) – केरळमध्ये २३ सप्टेंबरला पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाकडून पुकारण्यात आलेल्या बंदच्या वेळी करण्यात आलेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी राज्य सरकारची ८६ लाख रुपयांची हानी झाल्याची माहिती सरकारने केरळ उच्च न्यायालयात दिली. यासह सामान्य नागरिकांची १६ लाख रुपयांची हानी झाली आहे. हानीभरपाईची प्रक्रिया चालू केली आहे, असेही सरकारने स्पष्ट केले.