मुंबईतील ‘हलाल शो इंडिया’ ला तीव्र विरोध करणार ! – हलाल सक्तीविरोधी कृती समिती  

मुंबई, ठाणे आणि रायगड येथे आंदोलन अन् बैठका यांद्वारे राष्ट्रप्रेमी एकवटले !

घाटकोपर येथे ‘हलाल शो’ इंडियाच्या विरोधात एकवटलेले राष्ट्रप्रेमी नागरिक

मुंबई – हलाल प्रमाणपत्र आणि हलाल उत्पादनांची विक्री यांतून आतंकवादी कारवायांसाठी अर्थपुरवठा होत असल्याचे पुरावे समोर येत असल्यामुळे ‘हलाल शो इंडिया’च्या विरोधात राष्ट्रप्रेमी नागरिकांनी दंड थोपटले आहेत. ‘कोणत्याही परिस्थितीत हा कार्यक्रम होऊ देणार नाही’, अशी चेतावणी समस्त राष्ट्रप्रेमी नागरिकांनी दिली आहे. या कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ स्थापना केली असून प्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करण्याची चेतावणी दिली आहे.

मुंबईतील इस्लामिक जिमखाना येथे १२ आणि १३ नोव्हेंबर या दिवशी ‘ब्लॉसम इंडिया’द्वारे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी धारावी येथील श्रीराम मंदिर, घाटकोपर, भटवाडी, दादर (पश्‍चिम) येथील श्री सिद्धचक्र वर्धमान तप जैन आयम्बिल खाता आदी ठिकाणी बैठका घेण्यात आल्या, तर कल्याण रेल्वेस्थानकाच्या बाहेर राष्ट्रप्रेमी नागरिकांनी आंदोलन केले. पोलीस आणि प्रशासन यांनी ‘हलाल शो इंडिया’ला अनुमती दिल्यास मुंबईसह ठाणे अन् रायगड येथे तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी हलाल सक्तीविरोधी समितीने दिली आहे.